वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.

भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू वायू प्रदुषणामुळे होत आहेत. तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रदूषणाला बळी पडावे लागत आहे, असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो. यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे. याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

‘लँसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार वरील दहा शहरातील हवेत पीएम२.५ चे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबाबत पीएम२.५ ची जी मर्यादा आखून दिली आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाण असल्याचे अहवालात म्हटले आहे. संशोधकांनी सदर निष्कर्ष काढण्यासाठी २००८ ते २०१९ या वर्षांतील मृत्यूच्या नोंदी तपासल्या. या शहरांतील ३.६ दशलक्ष मृत्यूच्या कारणांची तपासणी केली गेली. त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००, चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे. दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.