मेक्सिको या देशाला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, त्यात ३४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ईशान्य आणि नैर्ऋत्य अशा दोन्ही बाजूंनी चक्रीवादळ आल्याने देशात हाहाकार उडाला. मुसळधार पावसाने अनेक शहरांत पूरमय स्थिती झाली आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळल्याने अनेक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या भीषण स्थितीमुळे मेक्सिको सरकारने
तात्काळ राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वेराक्रुझ या प्रांताला बसला आहे. या प्रांतातील २३ हजार लोक बेघर झाले आहेत. त्यापैकी नऊ हजार जणांना आपत्कालीन छावण्यांमध्ये आसरा देण्यात आला आहे. २० महामार्ग आणि १२ पूल उखडले असल्याने या प्रांतातील रस्ते वाहतूक थांबवण्यात आली आहे. याच प्रांतातील अल्टोटोंगा शहरात एका बसवर दरड कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती वेराक्रुझ प्रशासनाने दिली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या अनेक शहरांमधील वीजपुरवठा आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली आहे.
१९५८ पासून मेक्सिकोला कधीही चक्रीवादळाचा फटका बसला नाही. मात्र यंदा दोन विरुद्ध बाजूंनी आलेल्या वेगवेगळ्या चक्रीवादळाने देशात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याचे मेक्सिको सरकारने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा