देशभरात थंडीचा जोर कायम असून उत्तर प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे आणखी ३४ जण दगावले आहेत. उत्तर भारतामधील काही भागांतील पारा बुधवारी वर चढला असला तरी बहुतेक भागांत थंडीचा जोर कायम आहे.
राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी सकाळीही गारठा कायम असला तरी सकाळी सूर्यदर्शन झाले व तापमानातही सुधारणा झाली. बुधवारी दिल्लीत ४.४ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले, जे मंगळवारपेक्षा एक अंशाने अधिक असले तरी सामान्य तापमानापेक्षा ३ अंशांनी कमीच आहे.
उत्तर प्रदेशात थंडीमुळे आणखी ३४ जण मृत्युमुखी पडले असून त्यामुळे मृतांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यातील पाच जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्यापेक्षा कमी होता. देओरिया जिल्ह्यात पाच, गाझीपूर, कुशीनगर, महाराजगंज जिल्ह्यात प्रत्येकी चार, बालिया, रायबरेली आणि इटाह जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर बिजनौर, मिर्झापूर आणि चंदौली जिल्ह्यात दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशात थंडीचा जोर कायम असताना काश्मीरमधल्या नागरिकांना तापमानात सुधारणा झाल्याने दिलासा मिळाला. काश्मीरमधील काही भागांतील तापमान मंगळवारी रात्री पाच अंशांनी वधारले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा