तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागत समारंभात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ लोक ठार तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये १६ जण विदेशी नागरिक असल्याची माहिती इस्तंबूलचे गव्हर्नर वासीप शाहीन यांनी दिली. इस्तंबूल शहरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका नाईट क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी प्रथम एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याचे गव्हर्नर शाहीन यांनी सांगितले. परंतु, अद्याप दहशतवाद्यांच्या कोणत्याच गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. अद्याप विस्तृत माहिती समोर आलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा