तब्बल ३६ जणांच्या हत्या करून नेपाळमध्ये पसार झालेल्या बबलू दुबे या कुख्यात गुंडाला रविवारी नेपाळ पोलिसांनी येथे अटक केली. या हत्यांशिवाय १० कोटी रुपयांची खंडणी गोळा केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्य़ात स्वतची दहशत निर्माण करणाऱ्या दुबेने अनेक गुन्ह्य़ांप्रकरणी १० वर्षांचा तुरुंगवासही भोगला होता. या शिक्षेनंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. ३६ जणांच्या हत्या, कोटय़वधी रुपयांची खंडणी आदी प्रकरणांत पोलिसांना तो हवा होता. बिहार पोलिसांनी जारी केलेल्या माहितीच्या आधारे नेपाळ पोलिसांनी त्याला शोधून काढले.

Story img Loader