पाकिस्तानमधील पेशावर येथे आज (रविवार) एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ३६ जण ठार, तर ७० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेशावर शहरातील किस्सा खवानी बाजारातील पोलिस ठाण्याजवळच हा स्फोट झाला. पोलीस ठाण्याजवळ लावण्यात आलेल्या कारमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने स्फोट घडविल्याची शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे. स्फोटानंतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader