दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत लष्कराच्या चार जवानांसह हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ठार झाला. गुरुवारी जुन्या शहरी भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार झाला होता. दहशतवाद्यांचा गट बुचो गावाजवळ असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. लष्कराच्या जवानांनी गावाला वेढा घातल्यानंतर दहशतवादी जंगलात लपून बसले. या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान ठार झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. लष्कराच्या मदतीसाठी अतिरिक्त सुरक्षा दल मागविण्यात आले. सुरक्षा दलात आणि दहशतवांद्यामध्ये धुमश्चक्री झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. तर एक जवान गंभीर जखमी झाला.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2013 रोजी प्रकाशित
श्रीनगरमध्ये चकमकीत चार जवान शहीद
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत लष्कराच्या चार जवानांसह हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ठार झाला. गुरुवारी जुन्या शहरी भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार झाला होता.
First published on: 25-05-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 army jawans hizbul militant killed in encounter