फोर्ब्सने नुकतीच २०१८ या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप ५० महिलांची यादी जाहीर केली आहे. जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे चित्र आहे. नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत. नारखेडे यांचे वय अवघे ३२ असून त्यांनी या यादीत ३५ व्या स्थान पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यात उबेर कंपनीच्या संचालक कोमल मंगतानी यांनीही स्थान पटकावले आहे. त्या या कंपनीच्या बिझनेस इंटेलिजन्स विभागाच्या प्रमुख असून त्या वूमन हू कोड नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवतात. कामाक्षी शिवरामकृष्णन यांचीही या यादीत ४३ व्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. त्या ४३ वर्षांच्या असून त्यांची कंपनी आर्टीफीशियल इंटेलिजन्स विषयात काम करते. २०१० मध्ये त्यांनी आपल्या Drawbridge या कंपनीची स्थापना केली आणि अवघ्या ८ वर्षात त्यांनी आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे. तर पद्मश्री वारियर याही भारतीय महिलेने फोर्ब्सच्या यादीत नाव पटकावले आहे. अमेरिकेमध्ये NIO या चायनीज कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी Cisco आणि Motorola यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.