एकीकडे ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती न लागल्याने पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. असं असतानाच पंजाबमध्ये आज पहाटे गोळीबार झाला आहे. पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावर आज, बुधवारी पहाटे ४.३५ वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून हे चौघेही ८० मीडियम रेजिमेंटचे होते.

बुधवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. पुढील अनर्थ टाळण्याकरता शीघ्र कृती दलाला (Station Quick Reaction Team) तत्काळ सक्रीय करण्यात आले असून आजूबाजूचा परिसरही सील करण्यात आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, “लष्करी तळावर झालेला हा गोळीबार दहशतवादी हल्ला नसून अंतर्गत वादातून गोळीबार झाला असावा”, अशी प्रतिक्रिया भटिंडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक जी. एस. खुराना यांनी दिली.

गोळीबार करणारे साध्या कपड्यांत आले होते. तसंच, भटिंडा लष्करी तळावरून एका मासिकासह एक रायफल दोन दिवसांपूर्वी गायब झाली होती. रायफल शोधण्याचेही काम सुरू आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader