२० शाळकरी मुलांसह सहा नागरिकांचा बळी घेणाऱ्या कनेक्टिकट येथील शाळेतील गोळीबाराची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा अशीच एक घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पेनिसिल्वेनियाच्या ग्रामीण भागात झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले, तर काही पोलीसही जखमी झाले आहेत. पेनिसिल्वेनियाच्या गिजिटाऊन भागात झालेल्या या गोळीबारात चार जण मरण पावले असून त्यामध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याची माहिती ब्लेअर कौंटी आपतकाली व्यवस्थापन संस्थेची प्रवक्ती डायने मेलिंग यांनी दिली. या वेळी काही पोलीस अधिकारीही जखमी झाले असले तरी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे मेलिंग यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लागोपाठच्या या घटनांमुळे अमेरिकेत चिंता व्यक्त केली जात असून बंदूक बाळगण्याबाबतच्या कायद्याबद्दल देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांनीही शस्त्र कायद्याबाबत गंभीर असून शस्त्रसंबंधी नवीन विधेयकाला आपण पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader