मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चार दहशतवाद्यांना तीन दिवस चाललेल्या कारवाईत काश्मिरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळ लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातले. तीन दिवसांपासून लष्कराकडून घुसखोरी विरोधी कारवाई हाती घेण्यात आली होती.
“मंगळवारी हाती घेण्यात आलेल्या कारवाईत चार दहशतवादी ताबारेषेजवळील हाफरूदा जंगल भागात मारले गेले”, असे लष्कराचे अधिकारी म्हणाले.
या कारवाईत लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठ घेऊन मंगळवारी सिमेपलिकडून आलेला चार दहशतवाद्यांचा गट काश्मिर खोऱ्यामध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पाहऱ्यावर असलेल्या सावध सैन्याच्या तुकडीने त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरवला.
गेल्या चार दिवसांत काश्मिर खोऱ्यात एकूण नऊ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

Story img Loader