हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शहरात आणखी चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनांमुळे हैदराबाद हादरुन गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका १२ वर्षीय मुलीवर आजीच्या घरी जात असताना दोन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ३१ मे रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. सुलतानशाही परिसरात १ जून रोजी गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळून आली होती. कॅब चालकाने तिला कोंडुर्ग येथे एका मैत्रिणीच्या घरी नेले आणि तिथे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तिला खाली सोडले. या घटनेत शेख कलीम अली आणि मोहम्मद लुकमान अहमद यझदानी या ३६ वर्षीय आरोपींना पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

घरी नेऊन लैंगिक अत्याचार
तर दुसरी घटना एका किरकोळ दुकानात काम करणाऱ्या मुलीची आहे. ३१ मे रोजी २१ वर्षीय मोहम्मद सुफयानने तिला घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीने पोटदुखीची तक्रार केली होती त्यानंतर सत्य बाहेर आले. या घटनेनंतर काळा पत्थर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कारमध्ये बलात्कार
एका अनाथाश्रमातील आणखी एका अल्पवयीन मुलीवर २२ एप्रिल रोजी कारमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. केक विकत घेण्याच्या बहाण्याने आणि पीडितेशी एकांतात बोलण्याच्या बहाण्याने आरोपींनी कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी अनाथाश्रमातील एका मुलीकडे फोन सापडला असून तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा फोन आरोपीने दिली असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फोटोकॉपीच्या दुकानात काम करणाऱ्या २३ वर्षीय आरोपी सुरेशला पोलिसांनी अटक केली आहे.

चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार

चौथ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी देखील अल्पवयीन आहे आणि काही महिन्यांपासून पीडितेच्या संपर्कात होता. ही घटना महिनाभरापूर्वीची असून राजेंद्र नगर सर्कल हद्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

२८ मे रोजी हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात एका पार्टीनंतर घरी परतत असताना एका १७ वर्षीय मुलीवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या अल्पवयीन आरोपींपैकी एक आरोपी मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या (टीआरएस) स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्ष आणि भाजप यांच्यात वाद झाला आहे. अटक करण्यात आलेला दुसरा अल्पवयीन हा संगारेड्डी येथील एका राजकारण्याचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 more minor rapes reported in hyderabad after teens gang rape rocked city dpj