दंतेवाडा, छत्तीसगड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत चार नक्षली ठार झाले तर एक पोलीस शहीद झाला. ही चकमक शनिवारी सायंकाळी नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील सीमेवर दक्षिणेकडील अबूझमाडच्या जंगलात झाली. चकमक झाली त्यावेळी डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि एसटीएफचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. या चकमकीत डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
चकमकीनंतर गोळीबार थांबताच चार नक्षल्यांचे मृतदेह आणि एके-४७ रायफल व सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर)सह स्वयंचलित शस्त्रास्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. दरम्यान, चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच होती. नारायणपूर, दंतेवाडा, कोडागाव आणि बस्तर जिल्ह्यांत डीआरजी पथकासोबत नक्षलविरोधी मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा >>>OYO रुमध्ये आता अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या
दरम्यान, मुख्यमंत्री विष्णू देव सहाय यांनी सुरक्षा दल नक्षलवादाविरोधात मजबुतीने लढत असून ही समस्या संपुष्टात येईपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शहीद सन्नू करम यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे ‘एक्स’वर त्यांनी नमूद केले.
गत वर्षात २१९ नक्षल्यांचा खात्मा
यापूर्वी ३ जानेवारी रोजी छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला होता. हा परिसर रायपूर विभागात येतो. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाने २१९ नक्षल्यांना ठार केले होते. राज्यातील बस्तर विभागात दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे.