मॉस्को : रशियातील एका सभागृहात १३० जणांना ठार करणारा हल्ला घडवून आणल्याचा आरोप असलेल्या चौघांना रविवारी मॉस्कोतील एका न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघांच्या अंगावर बेदम मारहाण करण्यात आल्याच्या खुणा होत्या. एकजण सुनावणीदरम्यान जेमतेम शुद्धीत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन आरोपींनी या हल्ल्यासाठी आपण दोषी असल्याचे न्यायालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या लोकांची परिस्थिती पाहता ते मुक्तपणे बोलत होते का याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे. तिघांनी अथवा चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला असल्याबाबत रशियन माध्यमांमध्ये परस्पर विसंगत बातम्या प्रकाशित झाल्या.

हेही वाचा >>> गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द

दहशतवादी हल्ला घडवून आणून इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप तपासकर्त्यांनी देलाझरेन मिझरेयेव्ह (३२), साइदाक्रामी राचाबालीझोदा (३०), शमसिदिन फरिदुनी (२५) व मुखमदसोबिर फैझोव्ह (१९) या चौघांवर ठेवला आहे. या गुन्ह्यासाठी कमाल जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. माध्यमांनी ताजिकिस्तानचे नागरिक म्हणून ओळख पटवलेल्या या चौघांना २२ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश मॉस्कोतील बासमानी डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिला. सुरक्षा यंत्रणांनी तपासादरम्यान या चौघांचा छळ केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले. चौघांनाही जखमा झाल्या असल्याच्या खुणा दिसत होत्या व त्यांचे चेहरे सुजले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 suspects confess to deadly moscow attack zws