चीनमधील युनान प्रांतातातील भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता ४०० झाली आहे. ६.५ रिश्टरचा हा भूकंप होता. आता मदतकार्यासाठी तेथे हजारो सैनिक, पोलीस व अग्निशामक जवान यांना पाठवण्यात आले असून आठ विमानेही पाठवण्यात आली आहेत. भूकंपप्रवण युनान प्रांतातील या भूकंपात ३९८ जण बेपत्ता झाले आहेत. झाओटोंग व क्वििजग शहरातील १.०८ कोटी लोकांना या भूकंपाचा फटका बसला असून त्यात १८०१ जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर युनान नागरी प्रशासनाने २, ३०००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून एकूण ८० हजार घरे कोसळली आहेत तर १२४००० घरांचे नुकसान झाले आहे.

Story img Loader