गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानची राजधानी जयपूर येथे चार हजार किलो कांद्याची किरकोळ बाजारातून चोरी झाली. मुहान मंडी येथे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मंडईचा रखवालदार व एका महिलेचा समावेश आहे. त्यांनीच कांदा साठवण्यासाठी जागा दिली होती. पहारेकरी काजोर याला काल रात्री अटक करण्यात आली असून महिलेला आज पकडण्यात आले, असे चौकशी अधिकारी आशुतोष कुमार यांनी सांगितले.
दुकान मालक किशन अग्रवाल यांना कांद्याचा साठा गायब झालेला दिसला व त्यानंतर त्यांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला. काजोर याने या महिलेच्या मालकीच्या जागेत पिक अप व्हॅनमधून कांदे आणून ठेवले होते. यात इतर काही जणांचा हात असल्याचे नाकारता येत नाही, अजून तपास सुरू आहे. कांद्याच्या प्रत्येकी ६० किलोच्या सात गोण्या २८ व २९ ऑगस्टच्या दरम्यान रात्री चोरीस
गेल्या होत्या. त्याबाबत ३०
ऑगस्टला प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला होता. कांद्याच्या वाढत्या दरामुळे अनेक सामान्य लोकांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. कांद्याचे भाव सध्या ५० ते ६० रूपये किलो आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा