भूकंपामुळे दरडी कोसळून चीनमध्ये कृत्रिम तलाव तयार झाले आहेत़ त्यामुळे भूकंपबाधित ग्रामस्थांची सुटका करण्यात अडचणी येत आहेत़ शनिवारी चीनमध्ये युनान प्रांताला ६.५ रिश्टल स्केल भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला आह़े त्यात बळी गेलेल्यांची संख्या आता ४१० पोहोचली आहे, तर जखमींचा आकडा २,३०० आहे, अशी माहिती शासकीय वृत्तसंस्था झींहुआकडून देण्यात आली़
चीनचे पंतप्रधान ली केकिआँग घटनास्थळाजवळून बचावकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत़ दरडी कोसळून तयार झालेली तलावे बचावकार्यात अडथळे आणत आहेत़ या तलावांतील पाण्याची पातळीही वाढत असल्यामुळे तब्बल ८०० ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आह़े
या प्रकारच्या मोठय़ा तलावात सुमारे ३००० क्युबिक मीटर पाणी असल्याचा अंदाज आह़े या पाण्यामुळे अनेक घरे जलमय झाली आहेत आणि अन्यही घरांना त्याचा धोका आहे, असा अंदाज स्थानिक जलव्यवस्थापन अधिकाऱ्यांनी वर्तविला आह़े
पाण्याच्या पातळीत वाढ
या तलावांतील पाण्याची पातळी ३० सेमी प्रतितास वेगाने वाढत आह़े त्यामुळे सात विद्युत केंद्रही धोक्याच्या रेषेजवळ आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितल़े
युनान येथील चीनच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गुंगमिंग या गावात बचावकार्यासाठी पोहोचण्यासाठी यापैकी एका तलावातून पोहून जाण्याचा प्रयत्न केला़ परंतु जवानांची ही तुकडीच बेपत्ता झाली आह़े
घरांचे मोठे नुकसान
या भूकंपामुळे या भागांतील १२ हजारांहून अधिक घरे भुईसपाट झाली आहेत, तर तब्बल ३० हजार घरांचे नुकसान झाले आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा