पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या निवड यादीत ४४ भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. नेदरलँडमधील एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या या २०२४ सालच्या मोहिमेसाठी दोन पुरुष व दोन महिलांची निवड करण्यात येणार असून, जगभरातून तब्बल ७०५ जणांनी यासाठी आपली इच्छा दर्शवली आहे.
नेदरलँडमधील ‘मार्स वन’ या संस्थेने २०२४साली मंगळावर ‘एकतर्फी यात्रा’ नियोजित केली आहे. या यात्रेसाठी दोन पुरुष व दोन महिलांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी जगभरातून दोन लाखांहून अधिक जणांनी अर्ज केला होता. त्यातून १०५८ जणांना पात्र ठरवण्यात आले. यामध्ये ६२ भारतीयांचा समावेश होता. मात्र, या यादीतून ३५३ जणांची नावे वगळण्यात आली असून उरलेल्या ७०५ जणांमध्ये ४४ भारतीय आहेत. भारतीयांत २७ पुरुष व १७ महिलांचा समावेश असून ते मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि थिरूवनंतपुरम येथे राहणारे आहेत.
या मोहिमेअंतर्गत निवडण्यात येणाऱ्या चौघांना मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. ‘या साहसी मोहिमेच्या निवडप्रक्रियेची दुसरी फेरी आता सुरू झाली आहे. या मोहिमेत निवड होण्यासाठी इच्छुकांना बुद्धिमत्ता, ज्ञान, अनुकूलनीयता आणि व्यक्तिमत्त्वाच्या कसोटीवर उतरावे लागेल,’ असे मार्स वनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोर्बर्ट क्राफ्ट यांनी सांगितले.
मंगळ वारीच्या यादीत ४४ भारतीय
पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या निवड यादीत ४४ भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-05-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 44 indians shortlisted for one way trip to mars