रिलायन्स जिओ 44th Reliance AGM मध्ये 5G सेवा सुरू करण्याबाबत घोषणा करणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5G वरून पडदा उठविला गेला आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्हर्चुअल परिषदेच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली. यापूर्वी सांगण्यात आले होते की कंपनीने 5G चाचण्यांमध्ये 1Gbps वेग प्राप्त केला आहे. तसेच 5G नेटवर्कशी संबंधित तयारी पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले होते.

अमेरिकेत कंपनीकडून 5G ची यशस्वी चाचणीदेखील केली गेली आहे. म्हणजेच सरकारने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू करताच कंपनीकडून 5G सेवा सुरू केली जाईल. सरकार सप्टेंबरमध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार असल्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिओ इतर कंपन्यांच्या सहकार्याने 5G डिव्हाइस बनवित आहे. यात आरोग्य सेवा आणि किरकोळ वस्तूंचादेखील समावेश असेल. जिओने जगातील अन्य कंपन्यांना 5G साधने निर्यात करण्याचीही घोषणा केली आहे. जिओ 5G सोल्यूशनची टॉप स्पीड 1Gbps पर्यंत गेली आहे.

काय म्हणाले मुकेश अंबानी

रिलायन्स एजीएम २०२१ च्या निमित्ताने मुकेश अंबानी म्हणाले, भारत 2G मुक्त आणि 5G युक्त करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि 5G उपकरणांची श्रेणी विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसह काम करत आहोत. जिओ केवळ भारत 2G मुक्त करण्यासाठीच नव्हे तर 5G युक्त करण्याकरिता कार्य करीत आहे.

मुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा! 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये (Reliance AGM) रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे. “भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे”, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

Story img Loader