Unemployment : महाराष्ट्रासह, देशभरात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. बेरोजगार युवक आणि युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बेरोजगारीच्या ( Unemployment ) झळा अनेक पदवीधरांना बसत आहेत. पदवी मिळाली आहे पण नोकरी नाही अशी स्थिती आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सफाई कामगाराची पदभरती करायची आहेत त्यासाठी ४६ हजार पदवीधरांनी अर्ज केल्याची ही घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठल्या राज्यात घडली घटना?

हरियाणा सरकारच्या विविध खात्यांमध्ये, मंडळांमध्ये, महापालिकांमध्ये सफाई कामगारांची पदं ( Unemployment ) भरायची आहेत. त्यासाठी एक दोन नाही तब्बल ४६ हजार पदवीधरांनी अर्ज केला आहे. १५ हजार रुपये प्रति महिना पगाराची ही नोकरी आहे. ज्या पदवीधरांनी अर्ज केला आहे त्यापैकी ६ हजार जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर ४० हजार जण पदवीधर आहेत. १ लाखांहून अधिक असे अर्ज आलेत ज्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. नेमक्या किती जागा भरल्या ( Unemployment ) जाणार आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र आपल्याला नोकरी हवी या आशेने पदवीधरांनी सफाई कामगारांच्या ( Unemployment ) जागांसाठी अर्ज केले आहेत.

हे अर्ज का करण्यात आले आहेत?

सफाई कामगाराची नोकरी असली तरीही ती सरकारी नोकरी आहे. त्यामुळे त्यात स्थैर्य आहे, नोकरी जाण्याची भीती नाही त्यामुळे अनेकांनी अर्ज केले आहेत. सध्याच्या घडीला कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत रुढ झाली आहे. या परिस्थितीत स्थैर्य असणारी नोकरी मिळू शकेल म्हणून अनेक पदवीधरांनी आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. हरियाणा रोजगार निगम लिमिटेड तर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. या नोकरीसाठी अर्ज केलेल्या मनिष कुमार यांनी सांगितलं की मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. तसंच बिझनेस स्टडीजचा डिप्लोमा केला आहे. माझी पत्नी रुपा ही शिक्षिका आहे.

मनिष कुमार या अर्जदाराने काय सांगितलं?

मनिष कुमारने सांगितलं, खासगी शाळांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये १० हजार रुपये पगारही मोठ्या मुश्किलीने मिळतो. या ठिकाणी सरकारी नोकरी आणि १५ हजार पगार आहे. तसंच सफाई कर्मचाऱ्याची नोकरी ही दिवसभरासाठी नाही. त्यामुळे कामाचा ताण तेवढा नाही.

सुमित्रा नावाच्या महिलेने काय सांगितलं?

याच पदासाठी अर्ज केलेल्या सुमित्रा नावाच्या महिलेने सांगितलं की आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केला. हरियाणा स्टाफ सिलेक्शनमध्ये काम करण्याचं माझं स्वप्न होतं. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही त्यामुळे मी या पदासाठी अर्ज करते आहे. मला ही नोकरी मिळेल असा मला विश्वास वाटतो. मला पुढे शिकायचं आहे मात्र कुटुंबाने नकार दिला आहे. त्यामुळे माझ्याकडे आता नोकरी करुन शिकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

सफाई कामगार पदांसाठी ४६ हजार पदवीधरांचे अर्ज आल्याने विरोधकांनी हरियाणा सरकारवर टीका केली आहे. सरकारमध्ये पारदर्शकता नाही. हरियाणा राज्यातील काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावरुन भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 46 thousand postgraduates and graduates apply for sweeper post haryana scj