लिव्हिंग ब्लू प्लॅनेट संस्थेचा अहवाल
जगातील ४९ टक्के सागरी प्राणी व वनस्पती १९७० ते २०१२ या काळात नष्ट झाले आहेत. मोठय़ा प्रमाणात मासेमारी व इतर कारणांमुळे सागरी जीवसृष्टीला हा फटका बसला आहे. सागरी जीवसृष्टी त्यामुळे कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा जागतिक वन्यजीव निधीच्या लििव्हग ब्लू प्लॅनेट या संस्थेने दिला आहे. माशांचा साठा अति मासेमारीने २५ टक्के कमी झाला असन एकूण ६१ टक्के साठा वापरला गेला आहे. स्कॉमब्रिडी या प्रकारातील टय़ुना, मॅकरेल व बोनिटो या माशांचे प्रमाण ७४ टक्क्यांनी कमी झाले आहे. ब्लूफिन व येलोफिन मासे तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. १९७० ते २०१० या काळात माशांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. जगातील ७५ टक्के प्रवाळ बेटे नष्ट झाली असून त्यांचे आच्छादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. हा परिणाम तीस वर्षांत घडून आला आहे. प्रवाळ बेटांवर सागरी प्राण्याच्या २५ टक्के प्रजाती असून ८५ कोटी लोकांना त्यातून आíथक फायदा होत असतो त्यामुळे प्रवाळ बेटांची अवस्था खूप वाईट आहे. सागरी जलाची तपमानवाढ व आम्लता वाढ यामुळे २०५० पर्यंत प्रवाळ बेटे नष्ट होण्याची शक्यता आहे. खारफुटीच्या जंगलांचे आच्छादन १९८० ते २००५ या काळात २० टक्के कमी झाले आहे. त्याचे क्षेत्र जवळपास ३६ लाख हेक्टरचे आहे.
जगातील जंगले ज्या वेगाने नष्ट होत आहेत, त्याच्या तीन ते पाच पट जास्त वेगाने खारफुटीची जंगले नष्ट होत आहेत. शार्क मासे पकडण्याचे प्रमाण ३०० टक्के वाढले आहे. त्यामुळे २५ टक्के शार्क व स्केट्स मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. डब्ल्यू डब्ल्यू एफ इंटरनॅशनलचे महासंचालक मार्को लाम्बार्टेनी
यांनी सांगितले, की गरव्यवस्थापनामुळे सागरी जीवन धोक्यात आले आहे.
सागरी जीवसृष्टी धोक्यात येण्याची कारणे
’हवामान बदल व वाढते तपमान
’सागरी जलाची आम्लता वाढ
’मासेमारीचे अतिरेकी प्रमाण
’सागरी संपत्तीचे गरव्यवस्थापन