लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला गोवा आणि आसाम राज्यातील मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकांचा चौथ्या टप्प्यात भारतामधील सात राज्यांत शनिवारी मतदान घेण्यात येत आहे. आसाम, गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा राज्यात होणा-या या मतदानाच्या माध्यमातून तब्बल पन्नास लाख मतदार एकूण ७४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.
गोवा राज्यात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन मतदारसंघांसाठी मतदान होत आहेत. त्यापैकी उत्तर गोवा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत 33% तर दक्षिण गोवा मतदारसंघात 30% मतदान झाल्याची नोंद आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येसुद्धा मतदारांनी उत्साह दाखवत तब्बल 30 टक्यांच्यावर मतदान झाल्याचे समजत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजाविला असून मतदान केल्यानंतर प्रक्रिया देताना देशात ‘मोदींची लाट’ असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मतदानाला उत्तम प्रतिसाद
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला गोवा आणि आसाम राज्यातील मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
First published on: 12-04-2014 at 11:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th stage of loksabha election