नेपाळमध्ये शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ५.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गोरखा जिल्ह्यातील बारपार्क येथे सकाळी ११.३० वाजता या भूकंपाने नेपाळ हादरले. भूकंप विज्ञान केंद्रातील भूकंपतज्ज्ञ मुकूल भट्टाराय यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या शनिवारी नेपाळला ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जबरदस्त हादरा दिला. यामध्ये नेपाळची राजधानी काठमांडू शहर हे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. त्यानंतरही नेपाळमध्ये सतत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपाला आज आठवडा पूर्ण झाला. आतापर्यंत या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या सहा हजार ६२४ वर पोहोचली आहे तर जखमींचा आकडा १४ हजार २५ वर पोहोचल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.
नेपाळमध्ये पुन्हा ५.१ रिश्टर तीव्रतेचा धक्का
नेपाळमध्ये शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ५.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
First published on: 02-05-2015 at 02:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 1 magnitude earthquake strikes nepal again