भारत- म्यानमारच्या सीमाभागासह ईशान्येकडील काही राज्यांचा परिसर मंगळवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप ५.५ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा होता. याशिवाय, आसाममधील कार्बी आंगलोंग या भागातही पहाटे साडेपाच वाचता ३.१ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचे भूंकपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा धक्का जाणविण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर मोकळ्या जागेत आश्रय घेतला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोलकाता, गुवाहाटी, पाटणा, भुवनेश्वर आणि दिल्लीच्या भागांमध्येही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.