पूर्व लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरात भारतीय लष्कराचे पाच जवान वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हा भाग चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार जवान आणि एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) एका ड्रिलचा भाग म्हणून टी-७२ टँकमधून न्योमा-चुशूल परिसरात नदी ओलांडत असताना ही घटना घडली. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली, त्यामुळे अपघात घडला असे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

“दौलत बेग ओल्डी भागात काल संध्याकाळी नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) आणि चार जवानांसह पाच भारतीय लष्करी सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत,” असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >> UGC-NET २०२४ परीक्षेसाठी नवीन तारखा जाहीर; पेपरफुटी रोखण्यासाठी आता नव्या पद्धतीने होणार परीक्षा!

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “लष्कराच्या पाच जवानांच्या मृत्यूबद्दल त्यांना खूप दुःख झाले आहे. आम्ही आमच्या शूर सैनिकांची देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (२८ जून) शिमला, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनाची नोंद झाली. शिमल्यात, मल्याना परिसरात भूस्खलनामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यातही भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आणि वाहतूक ठप्प झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 army personnel dead in ladakh flash floods during tank exercise sgk