मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील काही उच्चवर्णीय व्यक्तींनी दलित अल्पवयीन तरुणांना बेदम मारहाण केली आहे. संबंधित दलित मुलांच्या गटाने काही उच्चवर्णीय मुलींची छेड काढली, असा त्यांच्यावर आरोप आहे. यातूनच उच्चवर्णीय व्यक्तींनी दलित मुलांना मारहाण केली. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उज्जैन जिल्ह्यातील गुर्ला गावात घडली. उच्चवर्णीय मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून दलित समाजातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच या मुलांना मारहाण करणाऱ्या सहा उच्चवर्णीय व्यक्तींनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास उनहेल पोलीस करत आहेत.

हेही वाचा- १० वर्षात ५१ जणांनी ९२ वेळा केला बलात्कार; पीडितेचा पतीच निघाला ‘मास्टरमाइंड’, VIDEO पाहून महिलेला बसला धक्का

उनहेल पोलीस ठाण्याचे प्रभारी कृषण लालचंदांनी यांनी ‘पीटीआय’ला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, दलित समाजातील काही अल्पवयीन युवकांनी शुक्रवारी संध्याकाळी उच्चवर्णीय मुलींवर अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. या प्रकारानंतर गावातील कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. पण शनिवारी सकाळी काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या समाजातील मुलींची छेडछाड केल्याचा आरोप करत या दलित मुलांना बेदम मारहाण केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणलं.

हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल

यावेळी पीडित मुलीही पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर काही कलमांतर्गत संबंधित पाच दलित मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मारहाण झालेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, उच्चवर्णीय आरोपींविरोधातही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अॅट्रोसिटी प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुर्ला गावात दलित आणि राजपूत समुदायाचे लोक मोठ्या संख्येनं राहतात, असंही लालचंदानी यांनी सांगितलं.