Five MBBS Students Killed in Kerala Road Accident : केरळमध्ये एका भीषण अपघातात ५ वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (KSRTC) जोरदार धडक बसली. ही दुर्घटना केरळच्या अलाप्पुझा (Alappuzha) येथे सोमवारी रात्री घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात कलारकोडे येथे रात्री १०च्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा जागीच चक्काचूर झाला आणि या विद्यार्थ्यांना कारचे तुकडे करून बाहेर काढावे लागेल.
दरम्यान अपघातात दगावलेले पाचही जण हे शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात एमबीबीएस(MBBS) चे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या विद्यार्थ्यांची ताबडतोब ओळख पटू शकली नाही, असे पोलीसांनी सांगितेल. अपघातग्रस्त कारमध्ये सात जण प्रवास करत होते, ज्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान या अपघाताचे नेमके कारण काय होते? याचा पोलीस तपास करत आहेत.
IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
अशाच एका दुर्घटनेत कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात एका २६ वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. हर्ष वर्धन असं या मृत अधिकाऱ्याचं नाव असून ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. हर्ष वर्धन हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते आणि ते पोलिसांच्या वाहनाने होलेनरसीपूर येथे त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी ड्युटीवर जात होते. मात्र, पहिल्या पोस्टिंगसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात रविवारी संध्याकाळी झाला. हर्ष वर्धन प्रवास करत असलेल्या पोलीसांच्या गाडीचे अचानक टायर फुटल्याने चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका घरावर आणि झाडावर जाऊन आदळली.
दरम्यान, हर्ष वर्धन यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.