इंग्लंडमधील एका पाच वर्षीय मुलीला दुर्मिळ आजारानं ग्रासलं आहे. अत्यंत दुर्मिळ अशा अनुवांशिक आजारामुळे तिचे स्नायू टणक आणि हाडासारखे होत चालले आहेत. एक एक करत काही दिवसात तिचे सर्वच अवयव हाडासारखे टणक होत जाणार आहेत. त्यामुळे तिला पुढचं आयुष्य दगडासारखं जगावं लागणार आहे. लेक्सी रॉबिन या पाच वर्षीय मुलीचा जन्म ३१ जानेवारीला अगदी सामान्य मुलांसारखा झाला. यावेळी फक्त तिच्या पायाच्या अंगठा आणि बोटांची हालचाल होत नव्हती. मात्र तेव्हा सामान्य असल्याचं डॉक्टरांनी रॉबिन दांपत्याला सांगितलं. मात्र जस जशी वर्षे वाढत गेली, तस तसा तिच्यात बदल दिसू लागला. त्यामुळे पालकांनी तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनाही सुरुवातीला तिला काय झालं आहे?, याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र बऱ्याच चाचण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ आजारांनं ग्रासल्याचं दिसून आलं. फायब्रोडिस्प्लासिया ओसिफिकन्स प्रोग्रेसिवा (एफओपी) हा आजार असल्याचं समोर आलं. एप्रिल महिन्यात काढलेल्या एक्स-रेमध्ये तिचा पाय हाडासारखा टणक होत असल्याचं दिसून आलं. तसेच बोटांमध्ये डबल जॉईंट दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा