भारताची राजधानी दिल्लीतील भजनपुरा परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. अवघ्या दोन सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दिल्लीच्या भजनपुरा येथील विजय पार्क परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणत्याही माहिती अद्याप समोर आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कसा झाला? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेचा तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 storey building collapsed in delhi viral video rmm