Jammu Kashmir 5 terrorists killed in encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झालेत. तसेच यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कदेर येथे संशयित दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध आणि नाकाबंदी मोहिम सुरू केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी उपस्थित असल्याच्या विशिष्ट माहितीनंतर १९ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी कुलगाममध्ये कादेर येथे संयुक्त मोहिम सुरू करण्यात आली. या भागात संशयित हालचाली दिसून आल्या, यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आमल्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले.

चालू महिन्यात यापूर्वी लष्कर-ए-तैयबाशी संबंधीत दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या दाचीग्राम भागात झालेल्या चकमकीत ठार झाला होता. हा दहशतवादी जुनैद अहमद भट गगनगीर, गांदरबल आणि इतर ठिकाणी सामान्य नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हत्येत सहभागी होता.

हेही वाचा>> Mumbai Boat Accident Video : ‘नीलकमल’ बोटीला नौदलाची स्पीडबोट धडकली तो क्षण कॅमेऱ्यात कैद; भीषण दुर्घटनेचा Video व्हायरल

गेल्या महिन्यात नुकतेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पेशल टास्क फोर्स ऑफ द नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या देशाच्या दहशतवाद विरोधी गटाला जम्मूमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 terrorists killed in encounter with security forces in jammu and kashmir 2 soldiers injured rak