अमेरिकेमधील नामांकित विमान कंपनी बोइंगने ७८७ ड्रीमलाइनरची उड्डाणे स्थगित केली आहेत. मात्र या विमानांची निर्मिती थांबणार नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ या विमानाची यंत्रणा आणि इंजिन व्यवस्था यांची कसून पाहणी करणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी याबद्दलची घोषणा बोइंगतर्फे करण्यात आली. ७८७ ड्रीमलाइनरची आठवडय़ाभरातील ५० उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. सन २०१३ मध्ये दोन विविध घटनांमध्ये इंजिनातील बिघाडामुळे ७८७ ड्रीमलाइनर या विमानास अपघात झाले होते. त्यामुळे जोपर्यंत फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून (एफएए) विमानाच्या इंजिन व्यवस्था आणि यंत्रणा उड्डाणासाठी सुरक्षित असल्याचा दाखला मिळत नाही तोपर्यंत उड्डाणे सुरू केली जाणार नाहीत, असे बोइंगच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader