वास्कोतील शाळेत सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाबद्दलची माहिती देणाऱ्यास गोवा पोलिसांनी ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले आहे, असे प्रवक्ते जॉन अग्यार यांनी सांगितले.
सदर आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी राज्य पोलिसांनी विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या शौचालयातच सोमवारी बलात्कार करण्यात आला. या घटनेचे वृत्त कळताच पालक आणि स्थानिकांनी जोरदार निदर्शने केली होती.
संशयित आरोपीने निळ्या रंगाची जीन्स आणि निळा, पांढरा आणि काळ्या रंगाच्या पट्टय़ा असलेला शर्ट परिधान केला होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी मंगळवारी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले होते. मात्र बुधवारी काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीवरून नव्याने रेखाचित्र तयार करून ते जारी करण्यात आले आहे.

Story img Loader