आपल्या आवडत्या मगरीचा मृत्यू झाल्याने शोकाकूल झालेले गावातील लोक सकाळच्या प्रहरी आपल्या सार्वजनिक तळ्याजवळ गोळा होऊन हुंदके देऊन रडत असल्याची एक आश्चर्यकारक घटना मंगळवारी छत्तीसगडमधील बेमेत्रा जिल्ह्यातील बवामोहत्रा गावात पहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लाडक्या गंगाराम नामक मगरीचा मृत्यू झाल्याने हे ग्रामस्थ शोकाकूल झाले होते. त्यानंतर या तीन मीटर लांबीच्या वृद्ध मगरीचे विधिवत अंत्यसंस्कारही करण्यात आले. ही मगर १३० वर्षांची असल्याचे येथील उप विभागीय वनाधिकारी आर. के. सिन्हा यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत या मृत मगरीचे शवविच्छेदन करण्यात आले. वय झाल्यामुळे नैसर्गिकरित्या या मगरीचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने अंत्ययात्रा काढण्यात येते अगदी त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या गंगाराम मगरीचे पार्थिव एका फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेऊन अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेला सुमारे ५०० लोक उपस्थित होते. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

ग्रामस्थ बसवान याने सांगितले की, गंगाराम मगर अतिशय माणसाळलेली होती. गावातील लहान मुले या मगरीच्या भोवती पाण्यात पोहायचे. मात्र, गंगारामने या मुलांना कधीही इजा केली नाही किंवा त्यांच्यावर हल्ला चढवला नाही. गंगाराम मगर नव्हता तर एक मित्र होता. आमच्यासाठी तो एक दैवी प्राणी होता त्यामुळे ग्रामस्थ त्याची पुजा करायचे. ग्रामस्थांनी आणि लहान मुलांनी दिलेला डाळभातही तो खायचा. तो खुपच समजुतदार होता. जर कोणी तळ्यामध्ये पोहायला उतरलेलं त्यानं पाहिलं तर तो तळ्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पहुडायचा, असे वीरसिंग दास नामक ग्रामस्थाने सांगितले. या गावचे सरपंच मोहन साहू म्हणाले की, या मगरीमुळे आमच्या गावाला विशिष्ट ओळख प्राप्त झाली होती. लोक आमच्या गावाला ‘मगरमछवाला’ गाव या नावानेच ओळखतात.

गावातील लोक खूपच भावनिकदृष्ट्या या मगरीशी जोडले गेले होते. त्यामुळे आम्ही मगरीचे पार्थिव ग्रामस्थांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी गावच्या ज्या सार्वजनिक तळ्यात ही मगर राहत होती त्या तळ्याच्या जवळच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या ग्रामस्थांनी आतातळ्याजवळ आपल्या लाडक्या गंगाराम मगरीच्या स्मरणार्थ एक पुतळा उभारण्याची इच्छाही व्यक्त केल्याचे, सिन्हा यांनी सांगितले.