सन १९६५ ते १९७१ या दोन युद्धात किमान ५४ जवान बेपत्ता असून ते पाकिस्तानच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे आहे पण पाकिस्तानने ते आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केलेले नाही असे लोकसभेत सांगण्यात आले.
पाकिस्तानशी १९६५ व १९७१ मध्ये झालेल्या युद्धात सुरक्षा दलांचे जे ५४ जवान बेपत्ता झाले त्यात सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. ते पाकिस्तानच्या ताब्यात असावेत असा संशय असला तरी पाकिस्तान ते मान्य करायला तयार नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.
लेखी उत्तरात त्यांनी बेपत्ता असलेल्या ५४ जवानांची नावेही दिली असून जून २००७ मध्ये या बेपत्ता जवानांच्या १४ नातेवाईकांच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानातील १० तुरुंगांना भेट दिली पण त्यात त्यांना बेपत्ता असलेले जवान सापडले नव्हते.
दुसऱ्या एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पण बेपत्ता मानल्या जाणाऱ्या सुरक्षा जवानांच्या नातेवाईकांना त्यांच्या निवृत्तीचे लाभ देण्याच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा