१९६५ आणि १९७१च्या युद्धांपासून बेपत्ता झालेले ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले असावेत, असा अंदाज केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी सोमवारी लोकसभेत व्यक्त केला. या सैनिकांची सुटका करण्यासंदर्भात भारत सरकारने वारंवार पाकिस्तानशी चर्चा केली. मात्र हे सैनिक आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे, असे अँटनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. यापैकी काही सैनिकांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेले १४ जणांचे शिष्टमंडळ २००७मध्ये पाकिस्तानमधील दहा तुरुंगांची पाहणीही करून आले, मात्र त्यांना प्रत्यक्षात कोणताही बेपत्ता भारतीय सैनिक आढळला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 missing soldiers in pakistan jail