भूकंपाचा प्रचंड हादरा बसलेल्या नेपाळमधील काठमांडूमधून ५५० भारतीय सुखरुपपणे मायदेशी परतले आहेत. शनिवारी रात्री १०.४५ पासून चार हवाई दलाची विमाने भारतात दाखल झाली. यामधून सुमारे ५४६ भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले.
वायूसेनेच्या पहिल्या विमानातून ५५ भारतीयांना रात्री ११ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर रात्री दीड वाजता १०२ भारतीयांना दुसऱ्य़ा विमानाने परत आणले. आज सकाळी ४ च्या सुमारास नवी दिल्लीत आलेल्या तिस-या विमानातून १५२ भारतीय परतले. सकाळी ६ वाजता चौथ्या विमानातून २३१ भारतीय परतले. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा प्रत्येक जिल्ह्य़ात शोध घेतला जात असून स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यास राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा