केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत माहिती दिली की पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानच्या ताब्यात ५७७ भारतीय मच्छिमार आहेत. “१ जानेवारी २०२२ रोजी देवाणघेवाण झालेल्या याद्यांनुसार, पाकिस्तानने ५७७ मच्छिमारांना ताब्यात घेतल्याचे कबूल केले जे भारतीय आहेत किंवा भारतीय असल्याचे मानले जाते. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत ९ भारतीय मच्छिमार पाकिस्तानी तुरुंगात मरण पावले, ”असे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी भाजपा खासदार महेश पोद्दार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


भारत आणि पाकिस्तानमध्ये कॉन्सुलर ऍक्सेस, २००८ वर द्विपक्षीय करार आहे, ज्याच्या अंतर्गत दोन्ही देश प्रत्येक वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी त्यांच्या संबंधित कोठडीत असलेल्या नागरी कैदी आणि मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण करतात.


मुरलीधरन यांनी संसदेच्या वरच्या सभागृहात माहिती दिली की भारतीय मच्छिमार आणि त्यांच्या मासेमारी नौकांवर संशयाची प्रकरणे नोंदवताच, इस्लामाबादमधील भारतीय मिशनने पाकिस्तान सरकारकडून कॉन्सुलर ऍक्सेस मिळविण्यासाठी तत्काळ पावले उचलली आहेत. “भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून, २०१४ पासून २,१४० भारतीय मच्छिमार आणि ५७ भारतीय मासेमारी नौकांना पाकिस्तानमधून परत आणण्यात आले आहे,” असे राज्यमंत्री म्हणाले.


गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानच्या तुरुंगात नऊ भारतीय मच्छिमारांचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये, तीन मच्छिमारांचा कोठडीत मृत्यू झाला, २०१८ मध्ये दोन, २०१९ मध्ये एक, २०२० मध्ये एकही नाही, २०२१ मध्ये दोन आणि २०२२ मध्ये १० मार्चपर्यंत एक मच्छिमार मरण पावला, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.