बिहारमधील अररिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. मुलांना घेऊन जाणारी कार थेट एका तलावात कोसळली. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बचावपथक पोहोचले असून एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा अपघात अररिया येथील ताराबडी परिसरात हा अपघात झाला. एका कारमध्ये काही मुले जात होते. ताराबडी येथे आल्यानंतर कार थेट तलावात जाऊन कोसळली. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मुलांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला की आणखी कशामुळे हे अद्याप समजू शकलेले नाही.

घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस पोहोचले आहेत. अपघातानंतर प्रशासनाने बचावाचे कार्य सुरू केले. यामध्ये एका मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमी मुलावर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 children dead after a car they were travelling in fell into a pond in ararriyas tarabadi bihar