एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित कुटुंबातील सदस्यांनी काल रात्री एकत्र जेवण केलं होतं. त्यानंतर आज सकाळी सर्वजण मृतावस्थेत आढळले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना हरियाणा राज्यातील अंबालानजीक असलेल्या बालाना गावात घडली आहे. एकाच कुटुंबातील सहाजण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत
याबाबत अधिक माहिती देताना अंबाला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जोगींदर शर्मा यांनी सांगितलं की, “बलाना गावात एकाच कुटुंबातील सहाजण संदिग्ध अवस्थेत मृत आढळले आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे, घटनास्थळी सुसाईड नोट आढळली असून पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा- पुणे : आजीच्या प्रसंगावधानामुळे शाळकरी मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला
कुटुंबातील सर्वजण रात्री जेवण करून झोपी गेले होते. पण आज सकाळी कुणीही उठलं नाही. आज या कुटुंबातील सर्वात लहान मुलगी आशुचा वाढदिवस होता. आशुच्या वाढदिवसाच्या एक काही तास आधीच ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संगत राम (६५), त्यांची पत्नी महिंद्रा कौर, सुखविंदर सिंग (३४), त्यांची पत्नी रीना आणि त्यांच्या दोन मुली, आशु (५) आणि जस्सी (७) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेचा अधिकचा तपशील मिळणं बाकी आहे.