Earthquake in Delhi NCR: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर आज (मंगळवार, ३ ऑक्टोबर) नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर ६.२ रिश्टर स्केलचा सलग दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या परिसरात अनेक वेळ धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
यामध्ये घरांची पडझड झाल्याची अथवा जिवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
उत्तर भारतातील विविध भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर उत्तराखंडच्या देहरादून येथील लोक इमारतींमधून बाहेर आले. यावेळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७५ मधील भूकंपाचा व्हिडीओ