राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात रविवारी (१९ नोव्हेंबर) पोलिसांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे. संबंधित पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झुंझुनू येथील निवडणूक रॅलीसाठी व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. ते सर्वजण नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात होते. दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ हा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित पोलीस कर्मचारी महिंद्रा एसयूव्ही कारने झुंझुनूच्या दिशेनं जात होते. दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. रस्त्यात दाट धुकं असल्याने पोलिसांची कार ट्रकला धडकली. या दुर्घटनेत पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे.

या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट लिहून मृतांबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.

रामचंद्र (५६), सुखराम (३८), कुंभारम (३५), थानाराम (३३), सुरेश (३५) आणि महेंद्र असं मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. ते सर्वजण नागौर जिल्ह्यातील खिनवसार पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव सुखाराम खोजा असं आहे.