छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये आयईडीचा स्फोट घडवून आणल्याने 7 जवान शहीद झाले आहेत, तर अन्य एक जवान गंभीर जखमी आहे. हा स्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जवानांच्या गाडीला लक्ष्य करुन हा स्फोट घडवून आणण्यात आला. शहीद जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलाचे 4 आणि जिल्हा दलातील दोन जवान आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दंतेवाडाच्या छोलनार गावातील ही घटना आहे. अत्यंत तीव्र क्षमतेची स्फोटकं वापरून हा स्फोट घडवण्यात आला. यात गाडीतील सातपैकी पाच जवान जागीच ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. एकावर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
यापूर्वी 13 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात शोधमोहिम सुरू असताना सीआरपीएफच्या जवानांवर आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये 13 जवान शहीद झाले होते. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरामध्ये पोलीस आणि लष्कराकडून शोधमोहिम सुरू आहे.
6 jawans dead, 1 injured according to preliminary investigation. Search operation is being held by security forces. Blast could be of high intensity, but the exact details will come after the investigation: Sunder Raj P, DIG Anti-Naxal Operation on Dantewada attack. #Chhattisgarh pic.twitter.com/bDDlJwxUkR
— ANI (@ANI) May 20, 2018
Chhattisgarh: 3 jawans of Chhattisgarh Armed Force & 2 jawans of District Force killed and 2 jawans injured in an IED blast on a police vehicle in Dantewada’s Cholnar Village. Troops of CRPF rushed to the spot, More details awaited. pic.twitter.com/J6a0JMpknn
— ANI (@ANI) May 20, 2018