अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याच्या नेतृत्वाला आव्हान देणारा आणि इराक तसेच सीरियाच्या मोठय़ा भूभागावर कब्जा मिळविलेला ‘आयएसआयएस’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला पाकिस्तान तालिबान संघटनेच्या सहा कडव्या नेत्यांनी मंगळवारी पाठिंबा जाहीर केला. बगदादीने स्वत:ला खलिफा जाहीर केले असून आपल्या संघटनेला स्वतंत्र इस्लामी राज्य म्हणून घोषित केले आहे.
पाकिस्तानी तालिबान्यांच्या ‘तहरिक ए तालिबान’ या गटाचा प्रवक्ता शाहिदउल्ला शाहीद याने आपल्यासह अन्य पाच म्होरक्यांचा बगदादी याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा