Youngest Organ Donor : नोएडातील ६ वर्षीय रोली प्रजापती हिची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, त्यानंतर तिच्या पालकांनी आपल्या मुलीचे अवयव दान करून पाच जणांना नवजीवन दिले आहे. यासह रोली नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची सर्वात तरुण अवयव दाता बनली आहे.

रोलीच्या डोक्यात गोळी लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे गंभीर दुखापतीमुळे ती कोमात गेली. यानंतर रोलीला दिल्लीच्या एम्समध्ये पाठवण्यात आले. या लहान मुलीला वाचवण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. एम्सचे वरिष्ठ न्यूरो सर्जन डॉ. दीपक गुप्ता म्हणाले, “रोली या साडेसहा वर्षाच्या चिमुरडीला २७ एप्रिल रोजी रुग्णालयात आणण्यात आले. तिला गोळी लागली आणि ती गोळी तिच्या मेंदूला लागली. मेंदूला पूर्ण नुकसान झाले होते. ती हॉस्पिटलमध्ये जवळजवळ ब्रेन डेड अवस्थेतच आली होती. म्हणून आम्ही घरच्यांशी बोललो.”

stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
IND vs AUS Tim Paine impressed with Dhruv Jurel
IND vs AUS : ‘तो फक्त २३ वर्षांचा आहे, पण…’, टिम पेन भारताच्या युवा खेळाडूच्या फलंदाजीने प्रभावित; म्हणाला, ‘तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना…’
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
australia Ban on social media use
सोळावं वरीस बंदीचं?…ऑस्ट्रेलियात १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सोशल मीडिया वापरास बंदी! कारणे कोणती?

रात्री १० नंतर रेल्वेमध्ये चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा होऊ शकते कारवाई

ते म्हणाले, “रोलीचे ब्रेन डेड झाल्यानंतर, आमच्या डॉक्टरांच्या टीमने पालकांसोबत बसून अवयव दानाबद्दल चर्चा केली. आम्ही पालकांचे समुपदेशन केले आणि विचारले की ते इतर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी अवयव दान करू शकतात का?” अवयव दान करून पाच जीव वाचवल्याबद्दल एम्सच्या डॉक्टरांनी रोलीच्या पालकांचे कौतुक केले आहे. रोलीचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया आणि हृदयाच्या दोन्ही झडपा दान करण्यात आल्या. या अवयवदानामुळे रोली दिल्लीच्या एम्सच्या इतिहासातील सर्वात तरुण दाता बनली आहे.

Health Tips : नोकरी करणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या

डॉ.गुप्ता म्हणाले, “अवयवदानाबद्दल फारशी माहिती नसतानाही हे पाऊल उचलल्याबद्दल आम्ही रोलीच्या पालकांचे आभारी आहोत. त्यांना इतरांचा जीव वाचवण्याचे महत्त्व समजले.”