भारतीयांना फिरायला खूप आवडतं आणि त्यासाठी ते नेहमीच वेगवेगळी ठिकाणे शोधत असतात. गुगलवर जाऊन नवनवीन ठिकाणांचा शोध घेणे हे तर प्रत्येकाचं आवडीचं काम असतं. नुकतंच एका सर्व्हेत 63 टक्के लोक हे काम ऑफिसमध्ये असताना करत असल्याचं समोर आलं आहे. सर्व्हेनुसार, लंच झाल्यानंतर हे प्रमाण जास्त असतं.
ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ट्रॅव्हल सर्च डेटा तपासला असून त्यानुसार ऑफिसमध्ये कामाच्या वेळात सुट्ट्यांसाठी नव्या ठिकाणांचा शोध घेण्याचं प्रमाण 63 टक्के आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान ट्रॅव्हल सर्चचं प्रमाण जास्त असून, ही ऑफिस वेळ असल्याचं आपल्याला माहित आहे.
सकाळच्या वेळी सर्चचं प्रमाण थोडं कमी असतं. मात्र लंचनंतर म्हणजे दुपारी 1 ते 3 दरम्यान होणारं सर्चचं प्रमाण 19 टक्के आहे. दुपारी 1 ते 3 ही वेळ म्हणजे अनेक ऑफिसमध्ये लंच झाल्यानंतची असते हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
या सर्चमध्ये 94 टक्क्यांसहित सर्वात जास्त पसंती दुबईला आहे. अनेकजण फिरण्यासाठी दुबईला पसंती देत असून सर्चचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यानंतर बँकॉकचा क्रमांक असून 92 टक्के लोक सर्च करतात. यानंतर सिंगापूर, बाली, इंडोनेशियाचा क्रमांक असून 37 टक्के लोक गोव्यासाठी सर्च करत असतात. सॅन फ्रान्सिस्कोदेखील सर्चमध्ये असून याचं प्रमाण 19 टक्के आहे. याशिवाय दिल्ली आणि मुंबई 12 टक्के आणि लंडन, न्यूयॉर्क दोन टक्के आहे.
अनेकदा कामावर तणाव असतो. अनेक भारतीय हा तणाव घालवण्यासाठी कुटुंब, मित्रांसोबत सुट्टीवर जाणं पसंत करतात. अनेकदा कामाच्या वेळातच सर्व प्लान होत असतात त्यामुळे जास्त सर्च केलं जात असावं.