नवी दिल्ली : गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नद्यांच्या संस्थांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त डॉल्फिन असल्याचे सरकारतर्फे सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉल्फिन प्रकल्पअंतर्गत भारतामध्ये पहिल्यांदाच नद्यांमधील डॉल्फिनची गणना करण्यात आली असून हे जगातील अशा प्रकारच्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणांपैकी आहे. डॉल्फिन आणि अन्य जलप्रजातींचे संवर्धन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

भारतात मुख्यत: गंगा नदीतील डॉल्फिन आणि सिंधू नदीतील डॉल्फिन आढळतात. हे दोन्ही डॉल्फिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी गंगा नदीच्या डॉल्फिनची संख्या जास्त आहे. आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाणारे हे डॉल्फिन गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना या नद्यांच्या संस्था आणि त्यांच्या भारत, बांगलादेश, नेपाळ व भूतानमधील उपनद्यांमध्ये आढळतात. भारतामध्ये सिंधू नदी लहानशा प्रदेशातून वाहते, सिंधू डॉल्फिनची संख्याही कमी आहे.

सर्वेक्षणात गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांच्या संपूर्ण प्रवाहाचा अभ्यास करण्यात आला. गंगा नदीच्या डॉल्फिनची संख्या ६,३२४ (५,९७७ ते ६,६८८ या श्रेणीत) इतकी असल्याचे समजले. तर बियास नदीमध्ये सिंधू प्रकारचे तीन डॉल्फिन आढळले.

सर्वेक्षणाची व्याप्ती

डॉल्फिन प्रकल्पअंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब या आठ राज्यांमधून वाहणाऱ्या या नद्यांमधील डॉल्फिनची संख्या मोजण्यात आली. हे सर्वेक्षण २०२१ ते २०२३ या कालावधीत करण्यात आले. त्यामध्ये आठ हजार किलोमीटरपेक्षा जास्त जलप्रदेशाची पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये ५८ नद्यांचे मूल्यांकन करण्यात आले

Story img Loader