दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पाच मजली इमारतीत मध्यरात्री लागलेल्या आगीत जवळपास ७३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काहींचे मृतदेह ओळखण्यात यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत.

या अपघातात जवळपास ४३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे प्रवक्ते रॉबर्ट मुलाउडझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच, बचावकार्यही सुरू करण्यात आले आहे.

Narayan Singh soldier body returns home after 56-year
५६ वर्षांनी सैनिकाच्या मृतदेहाचे अवशेष अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात, खिशातल्या ‘त्या’ कागदामुळे ओळख पटली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
girl died in dumper hit , dumper hit Goregaon,
गोरेगावमध्ये डंपरच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
Police died falling from local, Mumbai local,
मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
boy died leopard attack Junnar,
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
nashik shivshahi accident
नाशिक: ब्रेक नादुरुस्तीमुळे शिवशाहीची वाहनांना धडक, महिला गंभीर
stray dog ​​died man hit his on head with cricket bat in ​​Ghodbunde
ठाणे : भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू ,क्रिकेटच्या फळीने डोक्यात मारहाण
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

जळालेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू

पाच मजल्याची इमारत असल्याने प्रत्येक मजल्यावर आम्ही बचावकार्य सुरू केलं आहे. जळलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू असून त्यांना रस्त्यावर ब्लँकेट किंवा चादरीवर ठेवले जात असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.

गेल्या २० वर्षांत एवढी मोठी घटना घडली नव्हती. जोहान्सबर्ग शहरासाठी हा खरंच दुःखाचा दिवस आहे, असं मुलाउद्झी म्हणाले. रात्रभर लागलेली ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेणबत्तामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज महापौर Mgcini Tshwaku यांनी वर्तवला आहे.

इमारतीचा गेट बंद असल्याने लोकांचा मृत्यू

आग लागली तेव्हा या इमारतीत अनेकजण होते. अनेक लोक बेकायदा या इमारतीत असल्याचंही आढळून आलं आहे. इमारतीच्या आतील एक गेट बंद असल्याने आग लागल्यानंतर लोकांना बाहेर पडता आलं नाही. त्याच गेटवर अनेकांचे जळालेले मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली.