माहिती अधिकाराच्या कक्षा रुंदावण्याच्या मुद्दयावरून मतभेदाचे राजकारण सुरू असतानाच पंतप्रधान कार्यालयाने मात्र पंतप्रधानांच्या गेल्या नऊ वर्षांत झालेल्या परदेशवा-यांच्या खर्चाचा तपशील सादर करून राजकीय पक्षांसाठी आदर्शच घालून दिला आहे. नऊ वर्षांत पंतप्रधानांच्या हवाई प्रवासावर तब्बल ६४२ कोटी रुपये खर्च झाला आहे.
माहिती अधिकार कायद्यातील नियमांचे पालन करत पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या गेल्या नऊ वर्षांतील हवाई प्रवासावरील खर्चाचा तपशील सादर केला. नऊ वर्षांत पंतप्रधानांनी ६७ वेळा हवाई प्रवास केला. त्यासाठी ६४२ कोटी रुपये खर्च झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मंत्री व अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या परदेशवा-यांवर होणा-या खर्चाचा तपशील केंद्राने जनहितार्थ जारी करावा असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने अलीकडेच दिले होते. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने तातडीने हा तपशील जाहीर केला आहे, हे विशेष. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हवाईप्रवासावर २२३ कोटी रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले होते.
पंतप्रधानांच्या हवाई प्रवासांचा खर्च ६४२ कोटी
माहिती अधिकाराच्या कक्षा रुंदावण्याच्या मुद्दयावरून मतभेदाचे राजकारण सुरू असतानाच पंतप्रधान कार्यालयाने मात्र पंतप्रधानांच्या गेल्या नऊ वर्षांत झालेल्या परदेशवा-यांच्या खर्चाचा तपशील सादर करून राजकीय पक्षांसाठी आदर्शच घालून दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2013 at 05:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 642 carod expenditure on prime ministers air travel