तेलंगणा प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या निषेधात काँग्रेस पक्षाच्या तेलंगणातील सात खासदारांनी मंगळवारी आपल्या खासदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय सोमवारी घेतला.
आपण आपली राजीनामापत्रे घेऊन मंगळवारीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार आहोत, असे या खासदारांच्यावतीने सांगण्यात आले. आपल्या पुढील वाटचालीबाबतही आपण मंगळवारीच घोषणा करू, असेही त्यांच्यावतीने सांगण्यात आले.राज्य मंत्रीमंडळात असलेल्या तेलंगणातील नऊ काँग्रेस मंत्र्यांनी कोणत्याही त्यागाला आम्ही तयार आहोत, असे जाहीर केले आहे.

Story img Loader