अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-२ (Aspire-2 ) नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

सात मजुरांचा जागीच मृत्यू

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इमारतीच्या नवव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. यावेळी कामगार लिफ्टमधून सामान वरच्या मजल्यावर नेते होते. मात्र लिफ्ट सातव्या मजल्यावर पोहोचताच अचानक तुटली, आणि खाली कोसळली, यावेळी लिफ्टमध्ये एकूण ८ मजूर होते. यातील सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ , धाव घेत कामगारांना लिफ्टमधून बाहेर काढले.

अधिक वजनामुळे लिफ्ट कोसळल्याचा संशय

सर्व कामगार एकत्र लिफ्टमध्ये उभे होते. अधिक वजनामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लिफ्ट तुटताच आठही मजूर एकत्र खाली पडले. या कामगारांच्या सुरक्षेसाठी जाळीही बसवण्यात आली होती, मात्र ती कमकुवत निघाली. जाळीसह कामगार खाली पडले. यातील काही मजूर ग्राउंड फ्लोअरवर, तर काही मजूर बेसमेंटमध्ये पडले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला.

Story img Loader